इचलकरंजी दुप्पट वीजबिल आल्याने वस्त्रोद्योगात खळबळ ( यंत्रमागधारकात संताप )

ताजी बातमी ऑनलाईन टीम

२७ एचपी वरील वीज कनेक्शन असणाऱ्या यंत्रमागधारकांच्या वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी नसलेल्या यंत्रमागधारकांना दुप्पट वीजबिल आल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर वीज सवलत देण्याच्या निर्णयास वस्त्रोद्योग विभागाने यू-टर्न घेतल्यामुळे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांच्या काय पद्धतीबाबत यंत्रमागधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विविध संकटातून जात असलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी द्यावी अशी मागणी सवलत देण्याच्या निर्णयास वस्त्रोद्योग विभागाने यू-टर्न घेतल्यामुळे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांच्या काय पद्धतीबाबत यंत्रमागधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विविध संकटातून जात असलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी द्यावी अशी मागणी गेल्या काही वर्षापासून यंत्रमागधारकांच्या संघटनांकडून केली जात आहेर

ाज्य शासनाबरोबर केंद्र सरकारकडे वारंवार विविध मागण्या करूनही शासन वस्त्रोद्योगाकडे म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचा आरोप यंत्रमागधारकांतून केला जात आहे. २७ एचपी वरील कनेक्शन असणाऱ्या यंत्रमागधारकांना राज्य सरकारकडून प्रति युनिट चार रुपये १० पैसे ते ४ रुपये २५ पैसे इतक्या दराने विज देत होते. सवलतीच्या दरात वीज मिळवण्यासाठी शासनाने ग्राहकांना ऑनलाइन नोंदणीची अट घातली होती. मात्र सदरची ऑनलाइन पद्धत किचकट असल्याने बहुसंख्य कारखानदारांनी ऑनलाइन नोंदणी केली नव्हती.

Join our WhatsApp group