पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्य साठी इचलकरंजीत महामृत्युंजय जप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी इचलकरंजीत येथील कोल्हापूर रोडवरील शिवमंदिरात नमो ग्रुपच्या वतीने होमहवनसह ११ हजार महामृत्युंजय जप करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, सुनिल महाजन, अजितमामा जाधव, भाजप शहर अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर गेले असताना त्याठिकाणी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे भारत देशाची प्रतिमा जगभरात उंचावली गेली आहे.

Open chat
Join our WhatsApp group