Thursday, March 28, 2024
Homeब्रेकिंगआठ वर्षांपासून फरार आरोपीला CID ने कसे पकडले? ३६७ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा...

आठ वर्षांपासून फरार आरोपीला CID ने कसे पकडले? ३६७ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी पोलिसांना मिळाला आहे. ३६७ कोटी रुपये घोटाळातील हा आरोपी आहे. या घोटाळयाप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीकडे ७ गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यात तब्बल २६ आरोपींवर न्यायालयात दोषारोप पत्रसुद्धा दाखल झाले आहे. या घोटाळ्यातील पहिला गुन्हा दहिसर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. २०१२ ते २०१५ या कालावधीत हा घोटाळा झाला होता.

काय आहे प्रकरण
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळातील हे प्रकरण आहे. ३६७ कोटी रुपये अनुदानात अपहार झाल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी अन् महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम गेल्या 8 वर्षापासून कारागृहात आहे. या प्रकरणातील आरोपी कमलाकर रामा ताकवाले हा गेल्या आठ वर्षांपासून फरार होता.

कुठे केली अटक
कमलाकर रामा ताकवाले हा गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. सीआयडीच्या पथकाने त्याला संगमनेर परिसरातून अटक केली. कमलाकर ताकवाले स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्हयात राहत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. सीआयडी गेल्या चार महिन्यांपासून त्याचा छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहमदनगर भागत शोध घेत होती. मग सीआयडीला अहमदनगर जिल्हयातील अकोले आणि संगमनेर तालुक्यात तो स्वतःचे नाव बदलून रहात असल्याची माहिती मिळाली. तसेच स्वत:चे चारचाकी वाहन वापरत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली.

असा पकडला गेला
सीआयडी पथकाने त्याचा वाहनाची माहिती काढली. त्या वाहनाच्या फास्ट टॅगच्या माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरु केला. त्याच्यासंदर्भात मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणाच्या करण्यात आले. त्यानंतर तो कमलाकर रामा ताकवाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला संगमनेर येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -