Tuesday, March 19, 2024
Homeब्रेकिंगशेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५...

शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात रणशिंग फुंकले आहेत. यामुळे आता त्यांना राज्यात किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यांनी शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, पाणी मोफत, वर्षाला एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५ लाख रुपये मदत अशा आकर्षक घोषणेच्या जोरावर ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत जोरदार तयारी केली आहे.आधी विदर्भ-मराठवाड्यात जंगी सभा घेतल्यानंतर केसीआर यांचे गुलाबी वादळ आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपुर दिशेने आले आहे.

याठिकाणी अनेकांचे पक्ष प्रवेश होणार आहेत.आता प्रश्न आहे की ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होणार आहेत की नाहीत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केसीआर १९८५ साली पहिल्यांदा आमदार झाले. तिथून पुढे चार टर्म ते आमदार राहिले. १९९६ साली ते मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांच्या मंत्रीमंडळात परिवहन मंत्री झाले.परंतु आंध्रप्रदेशकडून २००१ ला तेलंगणातील लोकांवर होणाऱ्या भेदभावाच्या मुद्यांवरून त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. शेतकऱ्यांना त्यांनी अनेक चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -