ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे आणखी एक विधान परिषद आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे.
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीतीनुसार पुण्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज विधान परिषद आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.आज ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आणखी एक आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज हा पक्षप्रवेश होणार आहे. मात्र अद्यापही या विधान परिषद आमदाराचं नाव समोर येऊ शकलेलं नाहीये. शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
मनिषा कायंदेंचा शिवसेनेत प्रवेश
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना शिंदेंकडून पक्षात मोठी जबादारी देखील देण्यात आली. त्यांनी ठाकरे गट सोडताना पक्षावर गंभीर आरोप केले होते. आता मनिषा कायंदे यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक विधान परिषद आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहे