ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात दोन हजारांची वाढ

राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मानधनवाढीचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहेत.

३ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरण कंपनीकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रान्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.

राज्यमंत्री तनपुरे यांच्या आदेशावरून महावितरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मानधनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Open chat
Join our WhatsApp group