आलिया भट्ट झाली टॉपलेस! फोटोशूट पाहून तुम्हीच काय रणबीर कपूरही होईल थक्क

बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या अपकमिंग मुव्ही आणि तिच्या प्रेग्नसीमुळे चर्चेत आहे. ती प्रेग्नेंसीमध्येही तिने कामावर फोकस केला आहे. ती शुटिंगसह तिच्या अपकमिंग मूव्हिजचं देखील प्रमोशन करत आहे.

आलियाचा आगामी चित्रपट डार्लिंग आज ओटीटीवर रिलिज होणार आहे. अशातच आलियाचं फोटोशूट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाच्या नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

आलिया भट्ट हिने डब्बू रतनानीसाठी नुकतेच एक फोटोशूट केलं होतं.फोटोमध्ये आलिया खूप ग्लॅमरस दिसते आहे. आलियाचा फोटो टॉपलेस असून तिने केवळ गळ्याभोवती स्टोल टाकला आहे. आलियाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नणंदबाईंचाही आला रिएक्शन…
आलियाच्या न्यू लूकचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. अशातच या फोटोवर आलियाची नणंद आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर- साहनी हिची रिएक्शन आली आहे. रिद्धिमा हिने कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी शेअर केली आहे.

डब्बू रतनानी याने आलियाचा फोटो त्याच्या इंस्टा हँडलवर शेअर केला आहे. फोटोमध्ये आलिया ही टॉपलेस दिसते आहे. तिने गोल्डन स्कार्फने बॉडी कव्हर केली आहे. ‘गोल्डन आलिया भट्ट’, असं फोटोला कॅप्शन देखील दिलं आहे.

प्रेग्नंसीमुळे सध्या आलिया चर्चेत आहे. आलिया-रणबीर आणि कपूर फॅमिलीला बेबीची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आलिया भट्टने नुकतेच तिचा अपकमिंग मुव्ही ‘रॉकी आणि राणी की प्रेम कहानी’चे शूटिंग पूर्ण केलं आहे. ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीरसोबत दिसणार आहे. अशातच आलिया भट्टचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यात ती आपल्या कामाचं प्लानिंग सांगताना दिसत आहे.

Join our WhatsApp group