पन्हाळ्यावर ३७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह कोल्हापूर हायकर्सची

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या समर्थनार्थ ३७५ फूट लांब तिरंगा ध्वजाची पन्हाळ्यावर रॅली काढण्यात आली. कोल्हापूर हायकर्स, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर, व पन्हाळा नगरपरिषद, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ८ वाजता बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली.विद्यार्थी व नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत दोनशेहून अधिक विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. ही पदयात्रा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून ते राजदिंडी मार्गा पर्यंत झाली. या पदयात्रेनंतर सहभागी विद्यार्थी व नागरिक पन्हाळा ते पावनखिंड या साहस यात्रेला रवाना झाले. अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून साहस यात्रेला सुरुवात झाली.

Join our WhatsApp group