आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपण दिवसभरात कितीही व्यस्त असलो तरी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांशी संपर्कात असतो. व्हॉटसअ‍ॅपवरून मेसेज करणे, फाइल्स पाठवणे, कॉल – व्हिडीओ कॉल करणे अशा अनेक गोष्टी सहजरित्या करता येतात.

त्यामुळे अनेकजण व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला प्राधान्य देतात. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. नुकतेच व्हॉटसअ‍ॅपमध्ये एक नवे अपडेट आले आहे. ज्यामुळे सेटिंगमध्ये एक बदल करून तुम्ही ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही. या स्टेप्स वापरून तुम्ही सेटिंग्समध्ये ऑनलाईन स्टेटसमध्ये बदल करू शकता.

ऑनलाईन स्टेटस लपवण्यासाठी या स्टेप्स वापरा

व्हॉटसअ‍ॅप उघडून त्यातील वरच्या बाजुला असणाऱ्या तीन डॉट्सवार क्लिक करा.
त्यानंतर सेटिंग्स पर्याय निवडा.
त्यामधील अकाउंट पर्यायामधील प्रायवसी पर्यायावर क्लिक करा.
त्यामध्ये लास्ट सीन अँड ऑनलाईन हा पर्याय दिसेल, त्यावर ऑनलाईन स्टेटस खाली तुम्हाला ‘एवरीवन’ किंवा ‘सेम ॲज लास्ट सीन’ यापैकी एक पर्याय निवडा.
म्हणजेच हा पर्याय वापरुन लास्ट सीन लपवण्याप्रमाणे ऑनलाईन स्टेटसही लपवता येईल. अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे कोणालाही दिसणार नाही.

Join our WhatsApp group