जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत आजअखेर ९९.९१ टक्के काम पूर्ण झाले (Kolhapur voter list) आहे. यामध्ये २९ लाख १९३२ मतदारांची पडताळणी (डिजिटलायझेशन) पूर्ण झाले असून, चार लाख ५० हजार ३०२ मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये मृत, दुबार, अनुपस्थित, कायम स्थलांतरितांचा समावेश आहे. यातील अनुपस्थितांना सोमवारी (ता. १७) मोहिमेच्या अखेरच्या दिवशी अर्ज देता येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांची पडताळणी सुरू आहे. ता. २९ जून ते ता. ३० जुलैपर्यंत ही मोहीम पूर्ण करायची होती. परंतु, हे काम पूर्ण न झाल्याने ता. ८ ऑगस्ट व नंतर १७ ऑगस्ट, अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. अनुपस्थितांना सोमवारच्या अखेरच्या दिवशी काही पुरावे असल्यास ते सादर करण्यास संधी मिळणार आहे.
जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत आजअखेर ९९.९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये २९ लाख १९३२ मतदारांची पडताळणी झाली असून, चार लाख ५० हजार ३०२ मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये मयत, दुबार, अनुपस्थित, कायम स्थलांतरितांचा समावेश आहे.
सहा मतदारसंघांतील काम १०० टक्के पूर्ण
कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी, शिरोळ या सहा विधानसभा मतदारसंघांतील ‘एसआयआर’चे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.
