Homeमहाराष्ट्रसणासुदीत साखरेच्या दरात मोठी वाढ; १८ दिवसांत तब्बल १८ रुपयांची दरवाढ, दरवाढीमागे...

सणासुदीत साखरेच्या दरात मोठी वाढ; १८ दिवसांत तब्बल १८ रुपयांची दरवाढ, दरवाढीमागे नेमकं कारण काय?

सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली असून, अवघ्या 18 दिवसांत साखरेचा भाव तब्बल 18 रुपयांनी वाढल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

 

मध्य प्रदेशातील भोपाळच्या घाऊक बाजारात साखरेचा दर आता 61 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, एवढ्या कमी कालावधीत झालेली ही मोठी दरवाढ चिंतेची बाब आहे. (Sugar Price Hike)

 

साखर महागण्यामागे कारण काय?

 

साखरेच्या वाढत्या दरामागे सरकारचे साठा धोरण हे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या साठ्यावर मर्यादा असल्याने बाजारातील उपलब्धता कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. साठा मर्यादा कमी झाल्यास बाजारात पुरवठा वाढून दर काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

याशिवाय, अनेक साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे उसाचा काही भाग साखर उत्पादनाऐवजी इथेनॉलसाठी वापरला जात असल्याने साखरेच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. (Sugar Price Hike)

 

मिठाईच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता

 

सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशातच साखरेचे दर वाढल्याने मिठाईच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. साखरेचा पुरवठा आणि मागणी यामध्ये असलेली तफावत कायम राहिल्यास आगामी काळात दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -