Homeइचलकरंजीबहिणीसमोरच युवकाची रूई पुलावरून पंचगंगा नदीत उडी

बहिणीसमोरच युवकाची रूई पुलावरून पंचगंगा नदीत उडी

बहिणीसोबत प्रवास करत असताना एका ३२ वर्षीय युवकाने अचानक मोटारसायकल थांबवून रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून थेट पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. पयन अशोक शेंडे (वय ३२,रा. शेड्डुरे गल्ली, पट्टणकोडोली) असे नदीत उडी घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

 

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, पवन शेंडे हा आपल्या बहिणीसोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होता. प्रवास सुरू असताना रुई वेचील पंचगंगा नदीच्या पुलावर आल्यानंतर त्याने

 

अचानक गाडी बाजूला थांबवली. बहिणीला काही समजण्याच्या आतच पवनने थेट पुलावरून नदीच्या पात्रात उडी मारली. भावाला डोळ्यांदेखत नदीत उडी मारताना पाहून बहिणीने एकच आक्रोश केला.

 

बहिणीच्या टाहोमुळे आणि घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती तात्काळ हपरी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेला देण्यात आली आहे. शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पवनने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -