Friday, June 21, 2024
Homeआरोग्यविषयकओमिक्रॉनची लागण झाल्यावर तिसऱ्या दिवशी दिसतात ही लक्षणं, वेळीच घ्या स्वत:ची काळजी!

ओमिक्रॉनची लागण झाल्यावर तिसऱ्या दिवशी दिसतात ही लक्षणं, वेळीच घ्या स्वत:ची काळजी!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली असून देशभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची आधीच भीती असताना त्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आणखी भर घातली आहे.

देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. रोज ओमिक्रॉन रुग्णांचा नवा आकडा समोर येत आहे त्यामुळे आणखी भीती वाढत आहे. अशामध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर नेमकी काय लक्षणं दिसतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर तीन दिवसांनी रुग्णांमध्ये लक्षणे दिसू लागतात. लक्षणांच्या आधारे या रुग्णांना घरीच बरे केले जाऊ शकते. फक्त काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता भासू शकते.’

एम्सच्या मेडिसिन विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ नीरज निश्चल यांनी सांगितले की, ‘सध्या ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णसंख्या वाढत आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर बऱ्याच लोकांना तीन दिवसांनंतर लक्षणं दिसू शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये समोर आलेल्या डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) लागण झालेल्या रुग्णांमध्ये चार दिवसांनंतर लक्षण दिसत होती. अल्फा व्हेरिएंटमध्ये पाच दिवसांनंतर लक्षणं दिसत होती. म्हणजे इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणं लवकर दिसून येतात

– ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहावे. तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांना कळवा किंवा रुग्णालयात जा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -