Homeइचलकरंजीजबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहिम बंद करा पॉवरलूम असो.चा इशारा

जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहिम बंद करा पॉवरलूम असो.चा इशारा

स्मार्ट मीटरमुळे एम.डी. शुट होऊन वीज बिले तिप्पट ते चौपट येत असल्यामुळे यंत्रमाग व इतर उद्योजकांचा स्मार्ट मीटरवर विश्वास नसल्याने त्याला विरोध आहे. परंतु, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उद्योजकांवर दबाव आणून दडपशाहीने मीटर बदलण्याच्या पद्धतीचा इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याचवरोबर उद्योगाच्या ठिकाणीच असलेल्या मीटरनुसारच येणारी बिले भरली जातील, जबरदस्तीने मीटर बसविणेची मोहिम तात्काळ बंद करावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

या संदर्भात दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर व अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरला विरोध दर्शविणारे निवेदन दिले. यावेळी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील उपस्थित होते.

 

निवेदनात, कांही दिवसांपासून इचलकरंजी व परिसरात महावितरणकडून जुने वीज मिटर बदलली जात आहेत. जे उद्योजक मिटर बदलण्यास विरोध करीत आहेत, त्यांच्यावर दडपशाहीने भिती घालून दबाव आणत जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत. महावितरणचे कनिष्ठ अधिकारी व वावरमन दादागिरीची भाषा व चीज तोडगेची धमकी देण्यासह संपूर्ण भाग सिंगल फेज किया लाईट बंद करून मीटर बदलली जात आहेत, त्यामुळे उद्योजक व महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे व संघर्षाचे प्रकार घडत आहेत.

 

वीज जोडणीत फॉल्ट अथवा तांत्रीक दोष निर्माण करून तो दुरूस्त करायचा असल्यास मीटर बदलुन घ्यावेच लागेल किंवा मीटरचे रिडींग घेणार नाही अशी धमकी दिली जात आहे. त्यामुळे जागोजागी संघर्ष निर्माण होत आहे. तर आम्हाला निलंबनाची धमकी अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याचे उत्तर मिळत आहे. शिवाय काही ठिकाणी डांबावर मीटर असविणेत आलेली असून असे कृत्य महावितरणच्या कर्मचान्यांकडून होत आहे. त्यामुळे जबरदस्तीने मीटर बसविणेची मोहिम बंद करावी असे निवेदनात म्हटले आहे.

 

शिष्टमंडळामध्ये पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, राजगोंडा पाटील व प्रकाश गौड यांच्यासह यामागधारकांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -