Homeइचलकरंजीपर्यावरणपुरक विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज शहापूर खण येथे क्रेन, यांत्रिक बोटी, बचाव...

पर्यावरणपुरक विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज शहापूर खण येथे क्रेन, यांत्रिक बोटी, बचाव पथक आदि तैनात

अनंत चतुर्दशी रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ऑच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहापुर खण येथे क्रेन, यांत्रिक बोटी, रुग्णवाहिका आणि बचाव पथक तैनात करुन ३ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. हा विसर्जन सोहळा पर्यावरणपुरक, सुरक्षित आणि आनंदी वातावरणात होण्यासाठी मंडलांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या आयुक्त पानची पाटील यांनी केले आहे.

 

गणेश मंडळांच्या श्रीच्या मुर्ती विसर्जनासाठी शहापूर खण परिसरातील शहापूर हायस्कूलच्या मागे, ओपन जिमजवळ आणि बालाजीनगर केपील पद्या पॅलेससमोर अशा ठिकाणी सोय केली आहे. या तिन्ही ठिकाणी मुर्ती विसर्जनासाठी क्रेनची सुविधा, पुरेशी विद्युत व्यवस्था तसेच आवश्यक

 

सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गाचे आवश्यक पैचवर्क केले आहे. मोठ्या गणेशमूर्तीच्या वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत. विसर्जन स्थळांवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बाँच टॉवर उभारले असून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित केली आहे.

 

विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाहण्यासाठी महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, अभियंते, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी तसेच अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य विभागातील सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच शहरातील प‌ट्टीचे पोहणाच्या स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात

 

येणार आहे. विसर्जन स्थळांवर आपत्कालीन सेवेसाठी २ यांत्रिक बोटी, क्रेन, अधिशमन वाहन आणि वाहिकास ठेवण्यात येणार आहेत तसेच महापालिका आयजीएम रुग्णालय, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सेवाभारती रुग्णालय आणि आवाडे चरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकानि वैद्यकीय पथकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

वा विसर्जनाच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रमुख अधिकायांचे नियंत्रण राहणार आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडूर आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. शहरातील ज्या मंडळांच्या श्रींच्या मुर्तीची उंची ६ ते ८ फूट आहे अशा सर्व मंडळांनी आपल्या गणेशमूतीचे विसर्जन शहापूर खण येथे करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -