Homeइचलकरंजीकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर गल्लीबोळात कचऱ्याचे ढिग ; दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न

कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर गल्लीबोळात कचऱ्याचे ढिग ; दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न

शहरातील कचऱ्याचा प्रश्न मिटताना दिसून येत नाही. शहरातील प्रत्येक गल्ली बोळात कचऱ्याचे डीग दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, निर्माण झालेला कचरा तात्काळ उचलून संपूर्ण शहर कचरामुक्त करावे अशा सूचना संबंधित मक्तेदाराला महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.

 

घरोघरी जाऊन कचरा गोळा करून घंटागाडीद्वारे तो कचरा कचरा डेपो नेऊन टाकण्याचे टेंडर मक्तेदाराला देण्यात आले आहे. परंतु या

 

मुक्तेदाराकडून कचरा उठावाचे काम चांगल्या पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहे. या संदर्भात

 

महानगरपालिका प्रशासन तसेच महापौर यांनी वारंवार सूचना देऊन कामकाजामध्ये फारसा बदल दिसून येत नाही. सध्या मक्तेदाराकडे मनुष्यबळ

 

तसेच घंटागाड्यांची संख्या कमी असल्याने अनेक भागात वेळच्या वेळी कचरा उठाब होत नाही. गणेश उत्सव संपल्यानंतर अतिरिक्त कामगार

 

कचऱ्याच्या दिगाऱ्यात मुक्तपणे संचार करताना मोकाट कुत्री, डुकरे दिसत आहेत. (छाया. छोटूसिंग)

 

शाहु कॉर्नर परिसरात अस्ताव्यस्त पडलेला कचरा.

 

(छाया. छोटूसिंग)

 

शहरात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असताना या कचऱ्यामध्ये मोकाट कुत्री, डुक्कर मुक्तपणे संचार करताना दिसत असतात, यामुळे याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तेव्हा मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावी, अशी मागणी होत आहे.

 

लावून शहर कचरामुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, तसे दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यासह लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणी

 

दलदल निर्माण होत दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने संबंधित मक्तेदाराला ज्यादा कर्मचारी व जादा घंटागाडी उपलब्ध करून तात्काळ कचरा उचलावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -