Thursday, September 19, 2024
Homeतंत्रज्ञानRealme 9i बजेट रेंज स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू

Realme 9i बजेट रेंज स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू

Realme 9i स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला. हा कंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून तो Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह पावरफुल बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे. याशिवाय ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देखील आहेत. जर तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हे लक्षात घ्या की तो आजपासून म्हणजेच 25 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Realme 9i मध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे आणि त्याची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरून देखील हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank Credit Card वापरल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -