Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहात्मा फुले : प्रोत्साहन अनुदान मिळणार कधी?

महात्मा फुले : प्रोत्साहन अनुदान मिळणार कधी?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान योजनेतील 40 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पंधरा महिने उलटूनही प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकर्‍याला सरकारने ठेंगा दाखवला आहे.

राज्यात सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीची महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील कर्ज घेतलेल्या एकूण 89 लाख शेतकर्‍यांपैकी तब्बल 49 लाख शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरले तर उर्वरित 40 लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या योजनेतून नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्यासाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु पंधरा महिने होऊनही ही केवळ घोषणाच राहिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -