Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानअँड्रॉइड फोनमध्ये डिजिटल स्वाक्षरी करायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अँड्रॉइड फोनमध्ये डिजिटल स्वाक्षरी करायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताजी बातमी ऑनलाइन टीम
गोष्टी डिजिटल झाल्यामुळे लोकांना कामात खूप सहजता आली आहे. सोबतच वेळ आणि पैशाचीही बचत झाली आहे.अनेक कामे दुरून बसूनच ऑनलाईन केली जातात, तर कार्यालयात न जाता घरी बसूनही अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठीही फार दूर जाण्याची गरज नाही. त्याच वेळी, आवश्यक कागदपत्रे पीडीएफ आणि फोटो फॉरमॅटमध्ये शेअर केली जातात. मात्र दस्ताऐवजावर स्वाक्षरी कशी करावी असा प्रश्न पडतो. यासाठी अगदी साधी प्रक्रिया आहे. आज आपण डिजिटल डॉक्युमेंटवर स्वाक्षरी कशी करायची ते जाणून घेऊयात.

अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोणतीही पीडीएफ फाइलवर ई-साइन करू शकता आणि ती तुमच्या स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये सहज सेव्ह करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. आपण आपल्या अँड्रॉइड फोनच्या मदतीने खालील पद्धतीने ई-साइन करू शकतो.

अशी करू शकता स्वाक्षरी!
●सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये Adobe Acrobat Reader अ‍ॅप डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल.
●नवीन वापरकर्ते असाल तर नवीन खाते तयार करा.
●आता फाइल आयकॉनवर टॅब करा, जे स्क्रीनवर उपस्थित असेल.
●आता पीडीएफ डॉक्युमेंट निवडा ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी करायची आहे. याशिवाय तुम्ही Google Drive, One Drive आणि Dropbox इत्यादी वरून फाईल्स अटॅच करू शकता.
●यानंतर तुम्हाला कुठे आणि कोणत्या फाईलवर सही करायची आहे त्यावर एकदा टॅब करा.

●आता उजव्या कोपऱ्यात असलेल्या एडिट चिन्हावर क्लिक करा.
●त्यानंतर fill and sign या पर्यायावर क्लिक करा.
●खाली डावीकडे दिलेल्या स्वाक्षरी चिन्हावर क्लिक करा आणि डिजिटल स्वाक्षरी तयार करा.
●बॉक्समध्ये ई-स्वाक्षरी करा.
●तुम्ही ही स्वाक्षरी लहान किंवा मोठी करू शकता आणि गरजेनुसार कुठेही लावू शकता.
●तुमची फाईल पूर्ण झाल्यावर एकदा वर दिलेला चेक मार्क तपासून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -