Thursday, February 6, 2025
Homeकोल्हापूरनिपाणीत पद्मा गादी दुकानाला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

निपाणीत पद्मा गादी दुकानाला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

शहराच्या मुख्य जुन्या पी.बी रोडवर असलेल्या प्रसिद्ध सदानंद दत्तात्रय पाटील यांच्या मालकीच्या पद्मा गादी दुकान वजा कारखान्याला आज (गुरुवार) दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याने सुमारे कोट्यावधीची हानी झाली.

दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोलीस व स्थानिक नागरिक, व्यापारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ही आग दोन तास धुमसत राहिली. त्यामुळे या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत कोट्यावधीची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -