आता तुम्हाला पर्सनल लोन घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही Google Pay वापरत असल्यास, पर्सनल लोन घेणे तुमच्यासाठी एक चुटकीसरशी काम होईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, Google Pay वरून ताबडतोब लोन घेतले जाऊ शकते. वास्तविक, Google Pay a DMI Finance Limited सह भागीदारी केली आहे. या भागीदारीत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे डिजिटल पर्सनल लोन ऑफर करत आहेत.
Google Pay च्या ग्राहकांना DMI द्वारे दिलेली जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 1 लाख रुपये असेल. तुम्ही ते जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये परत करू शकता. ही भागीदारी देशभरात 15,000 पिन कोडवर सुरू करण्यात आली आहे.
लोन घेण्यासाठी ही अट आवश्यक आहे या लोन सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Pay ग्राहक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही Google Pay चे युझर असाल आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्हाला लगेच लोन मिळेल. तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.
हे इन्स्टंट लोन Google Pay वापरणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध होणार नाही. तुम्हाला लोन मिळेल की नाही हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असेल. या सुविधेअंतर्गत, केवळ प्री-क्वालिफाइड एलिजिबल यूजर्सच DMI फायनान्सने ठरवलेल्या निकषांनुसार लोन मिळवू शकतील. अशा ग्राहकांना Google Pay वरून लोन दिले जाईल.
जर तुम्ही प्री-अप्रूड कस्टमर असाल तर तुमच्या इन्स्टनर लोन अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल. प्रक्रियेनंतर काही मिनिटांतच पैसे तुमच्या बँक खात्यात येतील.