Monday, December 23, 2024
Homeबिजनेसपोस्टाच्या नियमात 1 एप्रिलपासून होणार मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम!

पोस्टाच्या नियमात 1 एप्रिलपासून होणार मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशातील बऱ्याच नागरिकांचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते ( Post Office Account) आहेत. तुम्ही देखील पोस्टाच्या विविध योजनांमध्ये (Post Office scheme) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिसने (post office) नुकताच आपल्या नियमात बदल (rule change) केला आहे. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून हे नवीन नियम (new rule) लागू होणार आहे. याबाबत पोस्टाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे पोस्टाचे नवीन नियम…



गुंतवणूक करण्यापूर्वी करावे लागणार हे काम
भविष्याची तरतूद म्हणून प्रत्येक जण काही न काही बचत करत असतो. सुरक्षित आणि जोखीम नसल्याने बहुतांश जण पोस्टात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. परंतु पोस्ट ऑफिसने आपल्या नियमात बदल केला आहे. याचा थेट परिमाण खातेधारकांच्या बचतीवर होणार आहे. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नियमानुसार आता ग्राहकांना गुंतवणूक करण्यापूर्वी बचत खाते किंवा बँक खाते उघडावे लागणार आहे. याशिवाय ग्राहकांना पोस्टात गुंतवणूक करता येणार नाही.


नवीन नियमानुसार, ग्राहकांना मुदत ठेव खात्या व्यतिरिक्त मुदत ठेव खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बचत खाते किंवा बँक खाते अनिवार्य आहे. पोस्ट खात्यात बँक किंवा बचत खाते जमा केल्यानंतर ग्राहक याठिकाणी गुंतवणूक करू शकतात. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नियमानुसार आता ग्राहकांनी पोस्ट ऑफिसचे लहान खाते आधीपासून अस्तित्वात असलेल्या बँक खात्याशी किंवा पोस्ट ऑफिस खात्याशी लिंक करून घ्यावे.

तर भरावे लागेल शुल्क
नवीन नियमानुसार, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पोस्ट बचत खाते किंवा चालू खात्यामधून आता दरमाह 25,000 हजार रुपये काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जर ग्राहकाला 25 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर एकूण रकमेच्या 0.5 टक्के शुक्ल भरावा लागणार आहे. याशिवाय ग्राहकाने जर दरमहा 10,000 रुपयांपर्यंत रोख ठेव केली तर त्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. परंतु 10,000 पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास किमान 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

अमर्यादित मोफत व्यवहार सुविधा होणार बंद
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेवर अमर्यादित मोफत व्यवहारांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र नवीन नियमानुसार, 1 एप्रिलपासून ही सुविधा संपणार आहे. त्यानुसार ग्राहकांना फक्त 3 वेळा मोफत व्यववहार करता येणार आहे. त्यानंतर प्रत्येक व्यववहारावर शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती पोस्ट ऑफिसतर्फे देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -