Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रमद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण ;  धक्कादायक प्रकार

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण ;  धक्कादायक प्रकार

आंबिवली स्थानकात  एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याला फेरीवाल्यानं (Police employee beaten) मारहाण केली आहे. या मारहाणी पोलीस कर्मचारी जखमी झालाय. आंबिवली स्थानकात एका पोलीसानं फेरीवाल्याला हटकलं होतं. हा फेरीवाला मद्यधुंद अवस्थेत होता. मद्यधुंद अवस्थेत लोकलच्या महिला डब्यासमोर  उभं राहून हा फेरीवाला शिविगाळ करत होता. त्यामुळे पोलिसाने या फेरीवाल्याला हटकलं होतं. दरम्यान, या फेरीवाल्यानं थेट पोलिसालाच मारहाण करण्याला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या आरोपीचं नाव गौतम कांबळे असं आहे. कल्याण जीआरपीनं गौतम कांबळेला बेड्या ठोकल्या आहेत. आता त्याच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

मंगळवारी (29 मार्च) रोजी आंबिवली स्थानकात ही घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार घडला. आंबिवली रेल्वे स्थानका पोलीस कर्मचारी रोहित जाधव हे कर्तव्य बजावत होते. फलाटावर हस्त घालत असताना त्यांची नजर एका फेरीवाल्यावर गेली. हा फेरीवाला आक्षेपार्ह भाषेत महिलांच्या डब्यासमोर उभा राहून बोलत होता.

महिलांच्या डब्यासमोर शिव्या घालण्याच्या या मद्यधुंद फेरीवाल्याला पोलीस कर्मचारी रोहित जाधव यांना हटकलं. लोकलच्या महिला डब्यासमोर उभा राहून गौतम कांबळे हा तरुण जोरदोर शिव्या देत होता. सुरुवातीला रोहित यांनी गौतमला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुच्या नशेत असलेल्या गौतमनं पोलिस कर्मचारी रोहित यांचं जराही ऐकलं. उलट अधिकच जोरजोरात शिव्या देण्यास सुरुवात केली. यानंतर गौतमला रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी रोहित यांनी गौतमला हटकलं. दरम्यान, नशेत असलेल्या गौतम यांनं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी रोहित जाधव हे जखमी झाले.

यानंतर कल्याणच्या जीआरपी पोलिसांनी गौतम कांबळेविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली . गौतम कांबळे हा फेरीवाला असून ते ठाणे स्थानकासह इतर स्थानकात फेरीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सध्या पोलीस गौतम यांची अधिक चौकशी करत आहेत.. दरम्यान, पोलिसांवर हात उचलण्याच्या या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -