जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागातील सीआरपीएफ बंकरमध्ये बुरख्यातील महिलेने बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल (Viral video) होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की बुरखा घालून आलेल्या माहिलेने सोबत आणलेल्या पिशवीतून बॉम्ब काढला आणि लायटरने पेटवून तो सीआरपीएफच्या बंकरवर (CRPF bunker) फेकला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सोपोर भागातील सीआरपीएफ बंकरसमोर बुरखा घातलेली एक महिला येते आणि तिच्या हातातील पॅकेट उघडते आणि त्यातून एक बॉम्ब काढते आणि लायटरने जाळून बंकरवर फेकते आणि पळून जाते. महिलेने बंकरवर पेट्रोल बॉम्ब (Petrol bomb) फेकल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये या घटनेनंतर सीआरपीएफचे जवान बंकरमधील आग विझवताना दिसत आहेत.जम्मू-काश्मीर परिसरातही दहशतवादी कारवायांमध्ये महिलांची सक्रियता वाढत आहे.
या घटनेची माहिती देताना काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सोपोरमधील सीआरपीएफ बंकरवर बॉम्ब फेकणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. तिला लवकरच अटक करण्यात येईल.