बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाबाबत चाहत्यांना खूपच उत्सुकता आहेत. त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न सतत उपस्थित होत होते आणि आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केला आहे. रॉबिन भट्ट यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच सात फेरे घेणार असल्याचे सांगितले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, आलिया आणि रणबीरचे लग्न खूप भव्य असेल आणि संपूर्ण कुटुंब खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते. 15 ते 17 एप्रिलच्या दरम्यान आलिया-रणबीर हे कायमचे एकमेकांचे होतील असा दावा मीडिया रिपोर्टद्वारे केला जात आहे. अशामध्ये बॉलिवूडमधील सर्वाच्या लाडक्या कपलच्या लग्नाबाबत आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी मुहर लावली आहे.
महेश भट्ट यांचा भाऊ आणि आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत अपडेट दिले आहे. इंडिया टुडेशी बोलताना रॉबीन भट्ट यांनी सांगितले की, ‘लग्नाचा कार्यक्रम 14 एप्रिलपासून सुरू होईल आणि चार ते पाच दिवस हा कार्यक्रम चालेल. या दिवसांमध्ये विविध विधी होतील. लग्न 17 एप्रिलच्या रात्री आलिया आणि रणबीरचे लग्न होणार आहे. तर 18 एप्रिलला रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाईल. ‘
रॉबिन भट्ट पुढे म्हणाले, ‘भट्टसाहेब आणि सोनी राजदानजी यांनी एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात आम्हाला सांगितले होते की, 17 आणि 18 एप्रिलला लग्नासाठी तयार राहा.’ बॉलिवूड लाईफला मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सब्यसाचीचे डिझायनर कपडे घालतील.’ एका सूत्राने सांगितले की, ‘आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही लोकांमध्ये लग्न करत असतील पण ते त्यांच्या पोशाखात कोणतीही कसर सोडणार नाहीत. हे जोडपे प्रत्येक कार्यक्रमानुसार वेगवेगळे पोशाख घातलीत. आलिया भट्टचा लेहेंगा लाल असेल कारण ती पंजाबी वधू आहे. रणबीर कपूर सोबर पण क्लासी लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याने त्याची प्रेयसी आलिया भट्टला त्याच्यासाठी लग्नाचे सर्व कपडे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.