Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रभरधाव कंटेनरच्या धडकेत प्राचार्य जागीच मृत्यू!

भरधाव कंटेनरच्या धडकेत प्राचार्य जागीच मृत्यू!

भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत प्राचार्य असलेले दीपक आधार पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज सकाळी १० च्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी कॉलेज जवळ घडली.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी दीपक आधार पाटील (वय-४५) यांचे भरधाव कंटेनरच्या धडकेत दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी सदर कंटेनरला (क्र. आर.जे-१४ जीजे ८५०८) ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दीपक पाटील हे धुळे रोडवरील शांतीदेवी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या दुदैवी घटनेमुळे तालुक्यातील भामरे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -