Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगखुशखबर! कोविशिल्ड, कोवॅक्सिन बूस्टर डोसची किंमत झाली कमी

खुशखबर! कोविशिल्ड, कोवॅक्सिन बूस्टर डोसची किंमत झाली कमी

कोरोनाच्या बूस्टर डोसच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. बूस्टर डोसची किंमत १२०० रुपयांवरून २२५ रुपये करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोवॅक्सिनची किंमत खाजगी रुग्णालयांसाठी २२५ रुपये करण्यात आली आहे. तर, कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आदर पूनावाला म्हणाले की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, SII ने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपये प्रति डोस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. १८+ वयोगटासाठी बुस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या या निर्णयाचे पुन्हा एकदा कौतुक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. उद्या, रविवारपासून (दि. १०) देशातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रौढ व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन १० एप्रिलपासून बूस्टर डोस घेऊ शकतात. ज्या लोकांनी ९ महिन्यांपासून लसीचा दुसरा डोस घेतला आहे ते या तिसऱ्या लसीसाठी पात्र असतील.

कोरोना व्हायरसचे आतापर्यंत डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रोन, डेल्टाक्रॉन, एक्सई, कॅप्का प्रकार आले आहेत. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सरकारकडून ठराविक कालावधीनंतर लसीचे दोन डोस लोकांना दिले जात आहेत. ICMR चे DG डॉ. बलराम भार्गव यांच्या मते, विषाणूचा एक प्रकार दुसर्याआ प्रकाराविरूद्ध संरक्षण प्रदान करत नाही, म्हणून पुन्हा संसर्गाचे रुग्ण तिसऱ्या लाटेत दिसून आले. याचा अर्थ असा होतो की, लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कालांतराने कमी होऊ लागते, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिसरा डोस आवश्यक आहे. लसीकरणामुळे गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -