Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगराज्यातील शाळांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

राज्यातील शाळांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय


महाराष्ट्रातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली असून यासंदर्भातील परिपत्रक राज्यातील शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे. त्यानुसार, 2 मे 2022 पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्या 12 जून पर्यंत असणार आहेत. त्यामुळे 41 दिवस शाळा बंद राहणार आहेत. राज्य सरकारने शाळांमध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुट्या 2 मे ते 12 जून या कालावधीत राहणार असून 13 जूनपासून नवीन सत्र सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले. राज्यातील सर्व शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक हेच राहील. विदर्भात दिवसा तापमान जास्त असल्यामुळे 27 जूनपासून तेथील शाळा सुरू होणार आहेत.

सध्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये ऑफलाइन परीक्षांची तयारी सुरू आहे. येथे इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शाळा बंद राहतील.

दरम्यान महाराष्ट्र दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल कदाचित मे महिन्यात जाहीर होतील. परीक्षेच्या निकालाची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. सध्या या दोन्ही वर्गांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -