आज, मंगळवार 12 एप्रिल, सकाळी 9:48 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 5.40% खाली आहे. आठवडाभरातील सततच्या घसरणीमुळे गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप $1.84 ट्रिलियनवर आले आहे.
Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात या दोन्ही चलनांमध्ये 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. Bitcoin ची किंमत पुन्हा एकदा 40 हजार डॉलरच्या खाली गेली आहे.
Coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 5.81% खाली $39,695.86 वर ट्रेड करत आहे. Bitcoin च्या किंमतीत गेल्या 7 दिवसात 15.01% ने घट झाली आहे. Ethereum ची किंमत आज गेल्या 24 तासांमध्ये 6.07% घसरून $2,981.94 वर आली. गेल्या 7 दिवसात त्यात 15.35% ने घट झाली आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.2% आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.6% आहे.
सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स SafeDogecoin (SAFEDOGE), ChikinCoin (CKC) 3110 Indian Shiba Inu (INDSHIB) हे गेल्या 24 तासांत जम्पर्स मध्ये होते. SafeDogecoin (SAFEDOGE) गेल्या 24 तासांत 1026.22% वाढला आहे. ChikinCoin (CKC) 304.22% च्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. Indian Shiba Inu (INDSHIB) ने 273.68% ची उडी घेतली
आहे.