Wednesday, August 27, 2025
Homeराजकीय घडामोडीकिरीट सोमय्या उद्या नवा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत

किरीट सोमय्या उद्या नवा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्याचबरोबर मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचेही उत्तर देणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. विक्रांत फाईल्स संजय राऊतांनी उघडल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या तेव्हापासून नॉट रिचेबल होते. सोमय्या फरार असल्याचा दावा संजय राऊतांनीही वारंवार ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी उद्या नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्राचा मुंबई अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे बोलताना उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे उद्धव साहेब, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणे हा माझा धर्म आहे, कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले.
ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही न्यायालयात सगळी माहिती देत आहोत, विक्रांतची मोहीम 1997-98 पासून 1997-98 पासून सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेने समर्थन दिले होते. सुरुवात 1997 सालापासून केली आहे. ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात, असे किरीट सोमय्या म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -