बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैय्या 2′ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिकचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच ‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरची आणि कार्तिक आर्यनच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.
‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटाचा टीझर एवढा जबरदस्त आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या टीझरला खूप चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. टीझरची सुरुवात प्रसिद्ध गाणं ‘आमी जे तुम्हारो’ने होताना दिसते. त्यानंतर या टीझरमध्ये एक जुनी हवेली पाहायला मिळत आहे. हा टीझर पाहता पाहता अचानक एक भयानक चेहरा समोर येतो. यानंतर कार्तिक आर्यनची दमदार एन्ट्री होते. गळ्यात रुद्राक्षांची माळ, डोक्याला बांधलेला रुमाल, कुर्ता घातलेल्या कार्तिकचा जबरदस्त लूक पाहण्यासारखा आहे. यासोबतच या टीझरमध्ये अभिनेता राजपाल यादवची झलकही पाहायला मिळत आहे.