कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.
फेरी 13
अकबर मोहला शिवाजी चौक,शाहू टॉकीज,महापालिका परिसर
जाधव 4386
कदम 2432
ही फेरी लीड 1964
एकूण लीड 11179
13 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 4386 मते मिळाली तर 2423 मते सत्यजित कदम यांना मिळाली आहेत. दरम्यान 1954 मतांचे लीड जयश्री जाधव यांनी घेतल्याने एकूण11179 मतांनी लीड घेतले आहे.
12 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 3946 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2908 मते मिळाली तर 9225 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.
11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2870 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2756 मते मिळाली 11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 8187 मतांनी जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.
10 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2868 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 3794 मते मिळाली 10 व्या फेरीत सत्यजित कदम 926 मतांनी आघाडी घेतली तर एकूण 8073 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.