Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकाँग्रेसला जोतिबा पावला: कोल्हापूरात जयश्रीजाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

काँग्रेसला जोतिबा पावला: कोल्हापूरात जयश्रीजाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम



कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12 एवढी मते मिळवली आहेत. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी विजय मिळविला. आज कोल्हापूरच्या जोतिबाची दोन वर्षानंतर यात्रा भरलेली असून जोतिबा कोणाला पावणार याकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागले होते.



या मतदार संघातील पोटनिवडणूक काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट
सामना रंगला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने कोल्हापूरची पोटनिवडणूकीत काँग्रेसने विजय निश्चित केला आहे. शिवसेनेबाबत भाजपाने अनेकदा अफवा पसरवल्या होत्या. कोल्हापूरचा खरा शिवसैनिक भाजपा मदत करेल असे खुद्द भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिक महाविकास आघाडी सोबत असल्याचे म्हटले होते, ते निकालावरून दिसून आले.



कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालासाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. कसबा बावड्यासह कोल्हापूरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स सकाळी 9 वाजता झळकण्यास सुरूवात केली होती. अखेर 12 वाजता निर्णायक आघाडीनंत कार्यकर्त्यांनी जयश्री जाधव यांच्या निवासस्थानी गुलालाची उधळण केली.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच JOIN व्हा ताजी बातमी मध्ये राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरीअखेर काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी 18 हजार 838 मतांनी विजय निश्चित झाला. 24 व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 92 हजार 12 तर सत्यजित कदम यांना 73 हजार 174 मते मिळाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -