ताजी बातमी ऑनलाइन टीम
मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या जुळ्या मुलांपैकी एकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. याचा मानसिक धक्का बसल्याने राेनाल्डाे लिव्हरपूल विरूध्दचा सामन्यात मैदानात उतरला नव्हता. मात्र आर्सेनलविरूध्दच्या सामन्यातून त्याने दमदार पुनरागमन केले.
या सामन्यात युनायटेडचा आर्सेनलने ३-१ असा पराभव केला.
मँचेस्टर युनायटेडचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने आर्सेनल विरुद्धच्या सामन्यात ३४ व्या मिनिटाला गोल नोंदवला. हा गोल त्याने आपल्या प्रसूतीनंतर दगावलेल्या मुलाला समर्पित केला. रोनाल्डोच्या जुळयाबाळांपैकी मुलाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. रोनाल्डो व जॉर्जिना यांनी याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. बाळाच्या मृत्यूमुळे रोनाल्डो परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. जुळ्या मुलांपैकी मुलगी सुखरूप असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले हाेते.
गाेल केल्यानंतर रोनाल्डोला चिमुकल्याची आठवण
शनिवारी आर्सेनलविरूध्दच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा २-० ने पिछाडीवर होता. सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल नोंदवून विरोधी संघाची आघाडी कमी केली. सामन्यात गोल नोंदवल्यानंतरची रोनाल्डोची सेलिब्रेशन स्टाईल जगप्रसिध्द बनली आहे; परंतु हा गोल नोंदवल्यानंतर रोनाल्डोने आकाशाकडे हात उंचवून आपल्या मुलाला श्रध्दांजली अर्पण केली. रोनाल्डोच्या या कृतीने मैदानावरील प्रेक्षक भारावले.