ताजी बातमी ऑनलाईन टीम
येत्या १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक संघटनांनी सभेला विरोध केला आहे. गुरुवारी (ता.२८) औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी राज यांच्या सभेला अखेर परवानगी दिली आहे. उद्या शनिवारी (ता.३०) पुण्याहून ते औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत.
यावेळी त्यांच्याबरोबर मनसैनिकही असतील. आज शुक्रवारी (ता.२९) राज ठाकरे यांचे पुण्यात आगमन झाले आहे. उद्या त्यांच्या यशासाठी पूजा करण्यात येणार आहे. यावेळी पुरोहित उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सभा होणार आहेत.
यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले जाईल असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची सभाही औरंगाबाद येथील सांस्कृतिक मराठवाडा मैदानावरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भव्य सभा होणार नसल्याचे सांगितले आहे. भीम आर्मीनेही राज ठाकरे यांच्या सभेला विरोध केलेला आहे.