Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगनवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; नेमकं कारण काय?

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; नेमकं कारण काय?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून ठाकरे सरकारवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या विरोधात राणा दांपत्याने दिल्लीत हनुमानचालीसेचेही पठाण केले होते. याच मुद्यावरून आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी राणा यांनी दिल्लीत नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी दिल्लीत हनुमान चालीसा म्हणत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. आता हनुमान चालीसेच्या मुद्यांवरून आपल्याला ठार मारू, अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांनी पोलिसात दिली आहे.



एका मुस्लिम धर्मगुरु कडून फोन कॉल आला आणि त्याने हनुमान चालिसा म्हण्टल्यास आपल्याला ठार मारू अशी धमकी दिल्याचे राणा यांनी पोलिसांना सांगितले आहे. नॉर्थ अहेन्यू पोलीस ठाण्यात तशी तक्रार त्यांच्याकडून करण्यात असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा या अनुमान चालीसा वादात सापडल्या आहेत. यावरून त्यांना तुरुंगातही जावे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -