ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी; कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धर्यशील माने यांच्या रूकडी गावांमध्ये धनगर समाजाच्या काही नेते मंडळींनी त्यांच्या समाजातील आठ कुटुंबांना वाळीत टाकले आहे यामध्ये एका आर्मीतील जवानाच्या कुटुंबालाही वाळीत टाकण्यात आले आहे त्यांच्या कुटुंबाबरोबर कोणी बोलायचे नाही त्यांच्याकडून काही साहित्य खरेदी करायचे नाही यांच्या सुखात दुःखात कोणी जायचं नाही जर गेले तर त्या कुटुंबाला पाच हजार रुपये दंड केला जातो असा आरोप धनगर समाजातील शिंणगारे कुटुंबानी असा आरोप केला.
रूकडी गावामध्ये धनगर समाजाची सुमारे 600 लोकसंख्या आहे. यातील काही कुटुंबे मुख्य गावातच राहतात. तर रेल्वे फाटकाच्या बाजूला काही कुटुंबे नवीन वसाहत करून राहिली आहेत. दिवसभर मेंढ्यांच्या मागे राना-वनात फिरून तसेच दुसऱ्याची जमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करणारा हा गरीब समाज आहे. गावामध्ये बिरोबाचे मोठे मंदिरही आहे. या मंदिरामध्ये पूजा-अर्चा करण्याचा मान जवळपास सर्वच कुटुंबांना फेरा-फेराने मिळतो; परंतु समाजातील नेते म्हणवून घेणाऱ्यांनी याचा मक्ताच घेतल्याने हिशेब मागायला कोणी गेले तर त्याला वाळीत टाकण्याची धमकी देऊन, आतापर्यंत अनेकांना वाळीत टाकले आहे, असा आरोप केला जातो. वाळीत टाकलेल्या कुटुंबातील व्यक्तीशी बोलले तरी बोलणाऱ्याला 3 हजार रुपये दंड केला जातो. व बोलल्याची माहिती देणाऱ्याला 500 रुपये बक्षीस नेत्यांकडून दिले जाते.
हा बहिष्कार आता लहान मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबांतील मुलांना खेळायला घेतले जात नाही. तसेच त्यांच्या दुकानातील साहित्यही खरेदी केले जात नाही. संबंधितांच्या घरी लग्न किंवा शुभकार्य असल्यास समाजातील इतर कोणीही जात नाही. गेल्यास त्याला दंड केला जातो. दंड न भरल्यास संबंधित कुटुंबालाच वाळीत टाकले जाते. बहिष्कृत कुटुंबांतील कोणाचा मृत्यू झाला तरी माणुसकी म्हणूनही कोणीही तिकडे फिरकत नाही. सध्या बहिष्कार घातलेल्या घरातील मुले मोठी झाली आहेत. शिकलेल्यांना सामाजिक जाणीव आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु अद्यापपर्यंतही त्यांना यश आलेले नाही. सैन्यदलात सेवा बजावणारे देवेंद्र शिणगारे यांच्या कुटुंबावरही बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच हातकणंगले पोलिसांत याबाबत तक्रार केली; परंतु या जवानाच्या पदरी निराशाच आल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.