Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीशेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा ; शिरोळ मधील प्रकार

शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा ; शिरोळ मधील प्रकार

ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिरोळ; ड्रीम मॉल शेअर मार्केट आणि अल्बा क्वाईनमध्ये दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेज (ता. चिक्कोडी) येथील दोघा जणांनी शिरोळमधील एका विधवेसह तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

गंडा घालणाऱ्यांपैकी एकजण तालुका पंचायत समितीकडे ग्रामसेवक म्हणून सध्या कार्यरत आहे. फसवणुकीची तक्रार देण्यास गेलेल्या विधवा महिलेला पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन गुन्हा दुसऱ्या पोलिस ठाण्यात दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती पीडित विधवा महिलेने दिली.

ड्रीम मॉल ट्रेडिंग कंपनी बंद पडल्यामुळे कोंडिग्रेसह जयसिंगपूर, शिरोळ, मजरेवाडी, नेज, कुरुंदवाड, निमशिरगाव, कुंभोज आदी ठिकाणचे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. नेज येथील जुन्या चावडीजवळ वास्तव्यास असणाऱ्या ड्रीम मॉल कंपनीचे संचालक व चालक सध्या कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन फरार झाला आहे. दरम्यान, कंपनीच्या ग्राऊंड पातळीवर लिडरशिप करणारे अन्य ग्रामसेवक, शिक्षक तसेच उद्योजकांचे धाबे दणाणले असून कोंडिग्रे गावात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -