ताजी बातमी ऑनलाईन टीम
डबल इंजिन असलेले डबल इंजिन विमानाने रविवारी पोखरा एअरपोर्टवरून उड्डान घेतली होती. परंतु विमान मस्तंगला पोहोचताच संपर्क तुटला. आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानाचा अपघात झाला असून मुस्तांग भागातील कोबानमध्ये अवशेष सापडले आहेत. 14 मृतदेह सापडल्याचीही माहिती मिळाली आहे. खराब वातावरणामुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे.
नेपाळमध्ये तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे फोटो सोमवारी समोर आले. 4 भारतीय नागरिकांसह 22 प्रवाशी होते. ते पोखराहून जोमसोमला निघाले होते. विमानाने रविवारी 9 वाजून 55 मिनिटांला उड्डाण केले. परंतु विमान मस्तंगला पोहोचताच ते संपर्काच्या बाहेर गेले.
विमानाचे छोटे छोटे तुकडे झाले…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान अपघात एवढा भीषण होता, की विमानाचे अक्षरश: छोटे छोटे तुकडे झाले. या विमानाच्या अवशेषाचे फोटो देखील समोर आले आहेत. आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून आतापर्यंत 14 मृतदेह सापडले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे.
नेपाळच्या तारा एअरलाइनचे कालपासून बेपत्ता झालेले विमान मस्तंगच्या कोवांग गावात सापडले. खराब हवामानामुळे कोवांग गावात विमान कोसळल्याची माहिती नेपाळ विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रमुखांनी देखील विमान अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे.