ताजी बातमी ऑनलाईन टीम
कन्हा नदीवर खंडोबा देवाचा पालखी सोहळा सोमवारी (दि. ३०) दुपारी साडे तीन वाजता पोहचला. कन्हा नदीवरील पापनाशक तीर्थावर कर्हेच्या पाण्याने देवाला स्नान घातल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
कन्हा स्नानानंतर श्री खंडोबा देवाचा सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. दिवसभरात एक लाखभर भाविकांनी कन्हा नदीवर येऊन देवकार्य केले. रखरखत्या उन्हात खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याच्या खांडेकरी व मानकरी यांनी अनवाणी पायाने दहा किलोमीटर पालखी खांद्यावर घेऊन पालखी सोहळा साजरा केला.