Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगधावत्या रेल्वेखाली उडी घेत मायलेकींची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली उडी घेत मायलेकींची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नाशिक (देवळाली कॅम्प) : येथील बान्स स्कुल रोडवरील मल्हारी बाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शिरोळे कुटुंबातील मायलेकींनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत माहिती अशी की, अनिता बाळासाहेब शिरोळे (43) व त्यांची मुलगी राखी बाळासाहेब शिरोळे (23) या पती बाळासाहेब शिरोळे यांच्या समवेत मल्हारी बाबा मंदिराजवळ राहतात. शिरोळे हे रेल्वेचे ठेकेदार असून ते रविवारी सोलापूरला कामानिमित्ताने गेले होते. घरात मायलेकी दोघीच होत्या. अचानकपणे रविवारी (दि. २९) सकाळी साडेनऊच्या सुमारास मायलेकींनी स्कुटीवरून रेल्वे ट्रॅक गाठत डाऊन लाईनवरुन धावणाऱ्या गितांजली एक्स्प्रेसखाली उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.


पोल क्र 176/5 जवळ दोघींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. याबाबत पाळदे मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना कळविली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. तर एकाचवेळी मायलेकींनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राखी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तर त्यांची थोरली मुलगी विवाहित आहे. मायलेकींनी आत्महत्या का केली, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -