Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात वकीलावर हल्ला; फुलेवाडी पेट्रोल पंपावरील प्रकार

कोल्हापुरात वकीलावर हल्ला; फुलेवाडी पेट्रोल पंपावरील प्रकार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर; कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. अजितराव मोहिते (वय ६५)आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश मोहिते (वय ३०) यांच्यावर फुलेवाडी येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. ३०) रोजी दुपारी घडली आहे. अजित मोहिते यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.



मुलगा ऋषिकेश हे डिझेल भरण्यासाठी फुलेवाडी येथील पेट्रोल पंपवर गेले होते. डिझेल भरल्यानंतर कार्ड स्वाइप करण्यावरून कर्मचारी आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला. यानंतर ऋषिकेश तक्रारीसाठी व्यवस्थापकाकडे जात असताना कर्मचारीही त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला.



याच दरम्यान ऋषिकेशचा शर्ट पकडून कर्मचाऱ्यानी धक्काबुक्की केली. दोघातील वाद सोडविण्यासाठी अॅड.अजित मोहिते गेले असता कर्मचाऱ्याने स्टीलचे बकेट उचलून त्यांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात अजित मोहिते गंभीर जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -