ताजी बातमी ऑनलाईन टीम
New Rules : 1 जून 2022 हा दिवस तंत्रज्ञानाच्या जगात (tech world) खूप खास आहे कारण या दिवशी अनेक मोठे बदल होणार आहेत. जे वापरकर्त्यांचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. येत्या 1 जूनपासून गुगल (Google) त्यांच्या काही सेवा (Google India) बंद करणार आहे आणि त्यानंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांना (Mobile Users) काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नेमके काय काय बदल होणार आहेत हे जाणून घेऊया…
इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार –
इंटरनेट जगतातील एकमेव ब्राउझर असलेला इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद होणार आहे हे जाणून काही वापरकर्त्यांना धक्का बसेल. 15 जूननंतर तुम्ही ही सेवा वापरू शकणार नाही. अशा परिस्थितीत जे लोक अजूनही इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) वापरत आहेत त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Amazon वर हे काम करू शकणार नाही –
जर तुम्ही देखील Android फोन वापरकर्ते असाल आणि Amazon अॅपवरून Kindle e-book खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 जून 2022 नंतर तुम्ही Kindle e-book खरेदी करू शकणार नाही. गुगल प्ले स्टोअरच्या नवीन धोरणामुळे हा बदल करण्यात आला आहे.