ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स चॅम्पियन बनल्यानंतर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या हंगामातील सर्वोत्कृष्ट टीम निवडली आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करून आपल्या टीममध्ये खेळाडूंना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे सचिनने भारतीय संघाचे भाग असणा-या अनेक दिग्गज खेळाडूंना झटका दिला आहे. यात मुंबईचा रोहित शर्मा आणि आरसीबीचा विराट कोहली यांचा समावेश असून त्यांना आपल्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, सचिनने निवडलेल्या संघाच्या कर्णधारपदी आयपीएल चॅम्पियन हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे.
धवन-बटलर सलामी जोडी
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जोस बटलरबरोबर डाव सुरू करण्यासाठी पंजाब किंग्ज सलामीवीर शिखर धवनची निवड केली आहे. बटलरने 863 धावा वसूल करत ऑरेंज कॅप जिंकली. तर धवनने 460 धावा करून आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. लखनौचा कर्णधार केएल राहुलला फलंदाजीसाठी तिसरे आणि कर्णधार हार्दिक पंड्याला चौथे स्थान दिले आहे.
संघात तीन फिनिशर
सचिनने आपल्या संघात तीन सर्वोत्कृष्ट फिनिशर्सची निवड केली आहे. यात डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. कार्तिकचे कौतुक करताना सचिन म्हणाला, ‘या हंगामात कार्तिकने विलक्षण सातत्य दाखवले. तो शांत आणि नियंत्रित दिसला. जेव्हा एखादा फलंदाज शांत असतो आणि त्याच्याकडे 360 खेळण्याची क्षमता असते, तेव्हा तो धोकादायक बनतो आणि या हंगामात दिनेश कार्तिकने असेच केले.’ (Tendulkar plyaing 11)