Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगलाच घेताना लिपिक पोलिसांचा जाळ्यात

लाच घेताना लिपिक पोलिसांचा जाळ्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या “तबदिलीस मनाई” हा शेरा कमी करुन देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील वरिष्ठ लिपिकास ५ हजारांची लाच (bribe) घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.३१) केली. चारूदत्त शंकरराव गावडे (वय ५७, रा. हुजर कॉम्पलेक्स पाठीमागे, भीवघाट रोड, तासगाव, जि. सांगली) असे लिपिकाचे नाव आहे.



तक्रारदार यांचे शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या “तबदिलीस मनाई” हा शेरा कमी करुन देणे करीता गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रूपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर आज (शुक्रवार) गावडे यांना ताब्यात घेण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भुसंपादन क्र. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी गावडे यांना तक्रारदार यांच्याकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.



ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अविनाश सागर, भास्कर भोरे, सलिम मकानदार, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -