ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर विमानसेवेवर (Kolhapur Airlines) परिणाम झाला होता. ज्यामुळे कोल्हापूरमधून होणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि पुन्हा विमानांची ये-जा सुरू झाली.
मात्र गेल्या सहा महिन्यापासूनकोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा ही बंद होती. ज्यामुळे गुजरातला जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांना रेल्वे सेवा आणि इतर वाहतुक साधणांवर अवलंबून राहावे लागतं होतं. मात्र आता प्रवाशांनी चिंता मिटली असून कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू होणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली. तर ही सेवा इंडिगो कंपनीमार्फत सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला नव्हता. येथे विमानतळ असूनही विमान मात्र उतरत नव्हतं. त्यामुळे अनेक चर्चा आणि प्रयत्नानंतर ते पुन्हा सुरू झाले आहे. तर येथून कोल्हार तिरूपती, अहमदाबाद, मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली होती. ज्यामुळे कोल्हापूरच्या विकासाची चाके गतिमान झाली होती. मात्र कोरोनाआला आणि ही चाके थांबली ज्यात कोल्हापूरमधून होणारी उड्डाणेही थांबली. तर कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर विमानसेवा ही अहमदाबाद येथील धावपट्टीच्या कामामुळे बंद झाली होती.