Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगMH CET Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता पदवी प्रवेशासाठी सीईटीसोबत 12वीचे गुणही...

MH CET Update: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता पदवी प्रवेशासाठी सीईटीसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे

ताजी बातमी ऑनलाईन टीम
उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्वत: याबाबद ट्वीट करून माहिती दिली होती. मात्र आता या परीक्षेत राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाचे बदल (Important Changes) केले आहेत. त्यानुसार आता पदवीच्या शिक्षणासाठी (Degree Education) सीईटीच्या गुणांसोबतच बारावी बोर्ड परीक्षेत (12th Board Exam) मिळालेले गुण देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं वाढणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.

पदवीच्या शिक्षणासाठी (Graduation) आतापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांवरून (CET marks) प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता बोर्डाचे 50 टक्के आणि सीईटीचे 50 टक्के अशा एकूण गुणांच्या आधारावर पदवी शिक्षणासाठी प्रवेश (Graduation Admission ) दिला जाणार आहे. यामुळे बारावीच्या गुणांना महत्व प्राप्त होणार आहे. सीईटीच्या गुणांच्या आधारावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी हा नियम लागू असणार आहे. यासोबत अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे पुढील वर्षापासून एमएचटी-सीईटीचा (MHT CET) निकाल नियमितपणे 1 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या धरतीवर ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आपले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना अधिक गुण मिळवण्याची संधी देखील देण्यात येईल अशीही घोषणा यावेळी शिक्षणमंत्र्यांनी केली. दरम्यान MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट 2022 दरम्यान घेण्यात येणार आहे तर, PCB ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -