Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमत्र्यांचे मोठं विधान..!

राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमत्र्यांचे मोठं विधान..!

जून महिना उजाडताच सगळ्यांना वेध लागतात, ते माॅन्सूनचे नि मुलांच्या शाळा उघडण्याचे.. गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने यंदा तरी शाळा सुरु होणार का नि कधीपासून, असा सवाल उपस्थित होत होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलंय.

शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, की “कोरोना संसर्ग वाढत असला, तरी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यंदा शाळा सुरु केल्या जाणार आहेत. येत्या 15 जूनपासून राज्यातील शाळा (Maharashtra School) सुरु होणार आहेत. 13 जूनला फक्त पहिलीच्या वर्गासाठी ‘पहिलं पाऊल’ हा कार्यक्रम होईल, तर अन्य शाळा 15 जूनपासून सुरू होतील..”

राज्यात सध्या मास्क सक्ती केलेली नाही. येणाऱ्या काळात परिस्थिती पाहून शाळांसंदर्भातील निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी ‘चाइल्ड टास्क फोर्स’ व आरोग्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही मंत्री गायकवाड यांनी सांगितले..

बारावीचा निकाल लवकरच…
बारावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे सांगितलं जात असलं, तरी त्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. याबाबत विचारणा केली असता, गायकवाड यांनी ‘बारावीचा निकाल लवकरच लागेल..’ असे एका वाक्यात सांगितलं.

बारावीच्या निकालानंतर देश पातळीवरील परीक्षांसाठी दिशा विद्यार्थ्यांना स्पष्ट होते. आतापर्यंत राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांचे निकाल बाकी असून, विद्यार्थी आणि पालकांना त्याची प्रतीक्षा लागली आहे.

बोर्डाच्या शेवटच्या पेपरनंतर 60 दिवसांनी निकाल जाहीर केला जातो, ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यंदा बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला असला, तरी 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे याआधी बोर्डानं सांगितलं होतं. त्यानुसार बारावीचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनअखेरीस जाहीर करू, असं गायकवाड म्हणाल्या होत्या. मात्र अद्याप अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर झालेली नाही..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -