मिरज/ प्रतिनिधी
पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांच्या आदेशानुसार घरफोडी,चोरी,हत्यार बाळगणे, खून अश्या गुन्हेगारांना पोलिस शोधत आहेत.तसेच काल सांगली येथे एकजण तलवार विक्रीसाठी आलेला होता.त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.
सचिन माने राहणार हनुमान नगर हा इसम फौजदार गल्ली येथे शाहु उद्यानात तलवार विक्रीसाठी करण्यासाठी बसला आहे.त्यावर लगेच सापळा रचून पकडून त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सचिन राम माने वय वर्ष २६ राहणार जुनी धामणी हनुमान नगर गल्ली नंबर ६ याला तलवार सोबत घेऊन अटक केली आहे.