Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगआता औषधांचा काळाबाजार थांबणार, केंद्र सरकारने आणला ‘हा’ नियम..

आता औषधांचा काळाबाजार थांबणार, केंद्र सरकारने आणला ‘हा’ नियम..

आपल्याला मेडिकलमध्ये गेल्यावर काही ठराविक कंपन्यांच्या गोळ्या दिल्या जातात. याच गोळ्या इतर मेडिकलमध्ये देखील दिल्या जातात. या कंपन्यांच्या गोळ्या खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात. यामुळे केंद्र सरकारने अशा कंपन्यांच्या उलाढालीवर विशेष लक्ष ठेवलं आहे. आता औषध नियामक प्राधिकरणाने एक नियम बनवला आहे.

देशातील औषध नियामक प्राधिकरणाकडून भारतातील 300 औषधांची यादी तयार केल्याचं समजतंय. ही यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे त्यांनी पाठवली असून त्यामध्ये QR कोड असणार आहे. या 300 औषधांवर QR कोड टाकण्याची तयारी सरकारने केली आहे.

केंद्र सरकारच्या मोठ्या नियमामुळे औषध कंपन्यांच्या औषध विक्रीत आणि किंमतीत पारदर्शकता येणार आहे आणि याच गोष्टींमुळे काळाबाजार कमी होण्यास मदत होईल. नवीन नियमांतर्गत QR मुळे कोड नागरिकांना ते खरेदी करत असलेली औषधं नकली आहेत की असली आहेत, याची माहिती मिळणार आहे.

कोणत्या औषधांची यादी..?

प्राप्त माहीतीनुसार, पेन रिलीफ, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, रक्तदाबासाठी औषधे, साखर व गर्भनिरोधक या औषधांचा यात समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने डोलो, सारीडॉन, फॅबिफ्लू, इकोस्प्रिन, लिम्सी, सुमो, कॅल्पोल, कोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72 आणि थायरोनॉर्म सारख्या दिग्गज ब्रँडचा समावेश आहे. ही सर्व औषधे खूप पॉप्युलर असून आणि ती ताप, डोकेदुखी, विषाणूजन्य, जीवनसत्वाची कमतरता, खोकला, थायरॉईड आणि गर्भनिरोधकांसाठी दिली जातात.

तसेच, या कंपन्यांच्या वर्षभरातील उलढालीच्या आकडेवारीनुसार या औषधांची निवड करण्यात आली आहे. त्यावरून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे औषध नियामक प्राधिकरणाने ही यादी पाठवली आहे. जेणेकरून त्यांना QR कोड नियमांतर्गत आणण्यासाठी आवश्यक तरतुदी आणि सुधारणा येऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -